English

सेवा

  • अभिलेखांची काळजी व निगा कशी राखावी याचा तज्ञ सल्ला शासनाचे निरनिराळे विभाग व खाजगी संस्थांच्या अभिलेखागारांना, ग्रंथालयांना दिला जातो.
  • राष्ट्रीय पुरालेखागार, नवी दिल्ली यांचेकडून, अभिलेखांचे जतन व संवर्धन करणा-या संस्थांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संचालनालय समन्वयकाचे काम करीत आहे.
  • अभिलेख व्यवस्थापन शास्त्र या विषयावर शासकीय, निमशासकीय कार्यालये, मंत्रालयीन विभाग, जिल्हाधिकारी, विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात.
  • शासकीय, निमशासकीय कार्यालये, मंत्रालयीन विभाग, जिल्हाधिकारी, विभागीय कार्यालयातील अभिलेखांची तपासणी करून त्यांना जतन व संवर्धनासंदर्भात सूचना देण्यात येतात.
  • देशी– विदेशी संशोधकांना त्यांच्या विषयाच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी संचालनालयातील अभिलेख पुरविला जातो. सुक्ष्मचित्रफित, झेरॉक्स, सी.डी., अद्ययावत ग्रंथालय तसेच संशोधक कक्ष या सेवा संशोधकांना, अभ्यासकांना पुरविण्यात येतात.
  • जनतेला, शासकीय विभागांना मागणीनुसार शासकीय राजपत्रांच्या छायाप्रती साक्षांकित करून पुरविण्यात येतात.
  • पुराभिलेख संचालनालयात जतन करून ठेवण्यात आलेला हा अभिलेखरूपी अमूल्य ठेवा जनतेला ज्ञात व्हावा म्हणून अभिलेखांवर आधारित परिसंवाद, कार्यशाळा, प्रदर्शने यांचे आयोजन महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही करण्यात येते.