English

सर्वसाधारण प्रश्न


प्र. पुरालेखागार म्हणजे काय?

उ. जिथे कागदपत्रे संग्रहित करुन जतन करून ठेवली जातात अशी जागा म्हणजेच पुरालेखागार. ऐतिहासिक आणि प्रशासनिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली कागदपत्रे पुरालेखागारात कायमस्वरूपी जतन करण्यात येतात.

प्र. पुरालेखागारातील रेकॉर्ड / कागदपत्रांचा अभ्यास कोण करु शकतो?

उ. संशोधन करणारे मान्यताप्राप्त संशोधक, विद्यार्थी, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी, विभाग प्रमुख, भारत सरकारचे आणि इतर राज्य सरकारचे अधिकारी, ऐतिहासिक अभिलेख आयोगाचे सदस्य, भारतीय विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक व पुराभिलेख संचालनालयाच्या संचालकांची परवांनगी प्राप्त इतर कोणतीही व्यक्ती.

प्र. रेकॉर्ड / कागदपत्रांच्या अभ्यासासाठी पुरालेखागारात नोंदणी करणे आवश्यक आहे काय?

उ. होय.

प्र. पुरालेखागारात मी नोंदणी कशी करावी?

उ. संचालनालयांच्या कार्यालयातील संशोधनासाठीचा विहित नमुन्यातील फॉर्म भरून नोंदणी करता येईल.

प्र. मायक्रोफिल्म्स(सूक्ष्म-चित्रीकरण), स्कॅन प्रतीमा आणि अभिलेखांच्या छायाप्रती मिळवू शकतो?

उ. होय, योग्य तो आकार आकारून सदर प्रती पुरविण्यात येतात.

प्र. परदेशी संशोधक पुरालेखागारातील कागदपत्रांचा संदर्भासाठी अभ्यास करू शकतात का ?

उ. परदेशी संशोधकांनी, ते मान्यताप्राप्त संशोधक असल्याबद्दल, त्यांच्या देशाच्या, भारतातील दूतावासांकडून पत्र सादर करणे आवश्यक आहे.

प्र. नोंदणी केल्यास मला कोणत्या सुविधांचा हक्क आहे?

उ. ग्रंथालय व अभिलेख संशोधन सुविधा.