अभिलेख मार्गदर्शिका

पुराभिलेख संचालनालयातील अभिलेखांचे सर्वसाधारणपणे चार कालखंडात वर्गीकरण करण्यात आले आहे.

1820 पूर्वीचा अभिलेख :

ईस्ट इंडिया कंपनीचा प्रत्येक विभाग आपआपल्या खात्याचा कारभार इ.स.1820 पर्यंत “डायरी” या स्वरूपात लिहीत असे. हा पत्रव्यवहार तारीखवार लिहिलेला आहे. अंदाजे 7000 इतकी याची संख्या आहे.

1820 नंतरचा अभिलेख :

कॉम्पिलेशन पध्दत 1821 पासून सुरू झाली . क्रमांक 1, 2, 3,…… असे या कम्पायलेशनना नंबर असून त्या समोर विषय नमूद केलेला असतो. त्यामुळे हवा असलेला अभिलेख शोधण्यासाठी सर्व कम्पायलेशन चे त्या त्या वर्षाचे विषय पहावे लागतात. यानंतर विषयाच्या वर्णानुक्रमानुसार त्याचे व्हॉल्यूम तयार करण्यात आले. त्यामुळे संशोधकाना हवा असलेला अभिलेख मिळणे सुलभ होते. परंतु व्हॉल्यूम तयार करण्याची पध्दत इ.स.1912 च्या दरम्यान वेगवेगळया विभागाने वेगवेगळया वर्षी बंद केली. अंदाजे दोन लाख व्हॉल्यूम संचालनालयात उपलब्ध आहेत.

1920 नंतरचा अभिलेख :

इ|स| 1921 पासून फाईल पध्दत अस्तित्त्वात आली. फाईल इंडेक्समध्ये मँक्सवेल पध्दतीनुसार विषय वर्णानुक्रमे लिहीलेले असून त्या त्या विषयासमोर फाईल क्रमांक लिहीलेला असतो. साधारणपणे 1950 – 52 सालापासून त्रिवर्णी फाईल पध्दत सुरू झाली. अंदाजे चार लाख इतकी फाईलची संख्या अभिलेखागारात आहे.

छापील अभिलेख, नकाशे, प्रकाशने, राजपत्रे, वर्तमानपत्रे, खाजगी अभिलेख इ.
पुराभिलेख संचालनालयाच्या अभिलेखागारात डायरी, व्हॉल्यूम , कम्पायलेशन, फाईल्स (नस्ती) याचबरोबर खालील प्रकारातील अभिलेख उपलब्थ आहे.

1. इनवर्ड लेटर बुक (आवक पत्र नोंदवही) – मुंबईच्या सुरूवातीच्या डायरीमधील पत्रांचा गोषवारा, टाचण इ. जो पत्रव्यवहार सेक्रेटरीएटमध्ये (फँक्टरी इ.) मिळत असे तो अप्रत्यक्षपणे सांगण्याच्या स्वरूपात इनवर्ड लेटर बुकमध्ये लिहीला जात असे.

2. आऊटवर्ड लेटर बुक किंवा आर्डर बुक (जावक पत्र नोंदवही किंवा आदेश नोंदवही ) – मुख्य कार्यालयांच्या नियंत्रणाखालील कार्यालयांना पाठविलेली पत्रे, टाचण, आदेश इत्यादी तसेच जे आदेश कंपनी सचिवालय व इंग्रज सरकारकडून पारित होत असत त्याची नोंद या नोंदवहीत घेतली जात असे.

3. मिनिट बुक (कार्यवॄत्तांत नोंदवही) – गव्हर्नर आणि त्यांच्या कौन्सिलपुढे एखादा विषय किंवा एखादे पत्र चर्चेसाठी किंवा विचारविनिमयासाठी आले तर कौन्सिलचे सभासद आणि गव्हर्नर त्यावर आपले जे मत प्रदर्शित करीत आणि शेवटी जो निर्णय घेतला जाई त्याची नोंद यात करण्यात येई. या टिपण्या भाषेमध्ये आवश्यक बदल करून डायरीमध्ये लिहील्या जात. मिनिट बुक ही डायरीची संक्षिप्त आवॄत्ती होय.

4. लेटर्स फ्राँर्म दी अँण्ड टू दी कोर्ट आँफ डायरेक्टर्स – या संग्रहात मा. न्यायालयाच्या संचालकांकडून मुंबई सरकारला आलेल्या व मुंबई सरकारने पाठविलेल्या पत्रांचा स्वतंत्रपणे समावेश केलेला आहे. यापूर्वी पत्रांच्या मालिकेला मा. न्यायालय आवक व जावक मालिका म्हटले जात असे. शासकीय अभिलेखांचे वर्गीकरण करण्यासाठी नेमलेल्या मेजर कँण्डी या अधिका-याने या पत्रांची विभागवार छाननी करून ती एकत्र करून घेतली.

5. इनवर्ड रजिस्टर (आवक नोंदवही) – मंत्रालयीन विभागांना इतर शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये किंवा खाजगी व्यक्ती इ. कडून जी पत्रे किंवा अर्ज येतात त्यांची तारीखवार व क्रमानुसार नोंद या नोंदवहीत केलेली आहे.

6. आऊटवर्ड रजिस्टर (जावक नोंदवही)– मंत्रालयीन विभागांनी पारित केलेले आदेश, इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयांना, तसेच खाजगी व्यक्तींना पाठविलेली पत्रे यांची नोंद क्रमवार व तारखेनुसार या नोंदवहयामध्ये केलेली आहे.

7. इंडायसिस (निर्देशांक) – संचालनालयात उपलब्ध असलेल्या, विभागांच्या डायरींच्या वर्षाच्या, शेवटच्या डायरीच्या खंडात इंडायसिस असतात. कम्पायलेशन किंवा व्हॉल्यूम मध्ये स्वतंत्र सूची खंड असतात.

8. सिलेक्शन किंवा सिलेक्टेड कम्पायलेशन (निवड आणि निवडक संग्रह केलेली नोंदवही) – यामध्ये विविध विषयाचा संग्रह आहे. मुंबईचा भूधारणाविषयक रिपोर्ट, कमिशनरचे विविध विषयांवरील रिपोर्ट, विदेशी साम्राजा विषयक रिपोर्ट, मुंबई शहरातील घरे, पोलिस आस्थापना, सावंतवाडी संस्थानावरील आक्रमण, रेव्हेन्यु सेटलमेंटचे रिपोर्ट, इ.बाबतचा पत्रव्यवहार या संग्रहामध्ये आढळतो.

9. सर्वे - (सर्वेक्षण)– मुंबई , गुजराथ, धारवाड यांचेशी संबंधित महसुल, संख्याशास्त्रीय व स्थलांतरित सर्वेक्षणाचा ( रेव्हेन्यु व टोपोग्राफिकल )अंर्तभाव या 20 खंडात आढळतो.

10. पोर्तुगीज अभिलेख – पोर्तुगीज भाषेतील अभिलेखांचे 6 व्हाँल्युम्स् अभिलेखागारात उपलब्ध आहेत. साधारणपणे 1714 ते 1819 या कालखंडातील हा अभिलेख आहे. या अभिलेखात काही वर्षांचा खंड पडला आहे. पोर्तुगीज भाषेत भाषांतरित झालेली ही पत्रे मुंबई ईलाख्याच्या गवर्नर कडून व गवर्नर ना तद्देशिय राजे, मलबार प्रांत व गोवा दमण येथील पोर्तुगीज सरकारांना पाठविण्यात आली आहेत. व्हॉल्यूम नं. 4 वर्ष 1714 ते 1717 आणि नं. 6 वर्ष 1819 या अभिलेखात न्यायालयीन कामकाजाविषयी तर व्हॉल्यूम नं. 5 वर्ष 1722 या अभिलेखात मुंबई बेटावरील जमीन महसूलाच्या नोंदवहया आहेत.

11. छापील अभिलेख – शासकीय प्रकाशने (पुस्तके), सिलेक्शन्स्, राजपत्रे, वर्तमानपत्रे, नस्त्या, सिव्हिल लिस्ट, शासकीय कार्यवाहीचे सार , विविध शासकीय विभागांचे वार्षिक अहवाल, शासनाने नेमलेल्या विविध समित्यांचे अहवाल इत्यादी प्रकाराच्या अभिलेखांचा समावेष आहे.

12. नकाशे – मुंबई पुरालेखागारात जवळ जवळ वीस हजार नकाशे उपलब्ध आहेत. मुंबई प्रांतात सर्वेक्षण करण्याचे काम साधारणपणे 1820 च्या सुमारास सुरू झाले. मुंबई प्रांत व आसपासच्या भागातील नकाशांचा यात अंतर्भाव आहे.

13. खाजगी अभिलेख – महाराष्ट्रातील ज्या ऐतिहासिक घराण्यांनी त्या काळात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची कामगिरी बजावली होती, अशा घराण्यांच्या पत्रव्यवहारांचे संग्रह (दप्तरे) मुंबई पुरालेखागारात जतन करून ठेवण्यात आले आहेत.

सांगलीचे पटवर्धन, म्हसवडचे माने, रायगाव येथील राजे मोहिते, पाटणचे पाटणकर अशा महत्वाच्या घराण्यांची दप्तरे यात आहेत. यातील बहुतेक कागदपत्रे मोडी लिपीत तर काही पर्शियन भाषेत आहेत.

संदर्भ साधने की बुक्स् - व्हाँल्युम्स् लिस्ट, इंडायसेस, प्रेस लिस्ट, वर्णनात्मक सूच्या या साधनांद्वारा अभिलेखांतून संशोधन करणे सुलभ होते, संशोधकाला योग्य ती मदत होते, त्याचा वेळ वाचतो.

की बुक्स – या अभिलेख संदर्भसाधनांमध्ये मुख्य विषय वर्णानुक्रमानुसार नमूद केलेले आहेत. विषयासमोर कम्पायलेशन क्रमांक लिहिलेले आहेत. ब–याच ठिकाणी व्हॉल्यूम क्रमांकही नमूद केलेला आहे. परंतु ज्या विषयासमोर व्हॉल्यूम क्रमांक लिहिलेला नाही त्यासाठी व्हॉल्यूम लिस्टचा आधार घ्यावा लागतो.

उपलब्ध असलेल्या की बुक्सचा तपशील खालीलप्रमाणे :–

अ.क्र. विभागाचे नाव वर्षे
1. जनरल डिपार्टमेंट 1843 – 1892
2. पोलिटिकल डिपार्टमेंट 1832 – 1922
3. रेव्हेन्यु डिपार्टमेंट 1857 – 1921
4. मिलिटरी व मरीन डिपार्टमेंट 1870 – 1879
5. ज्युडीशियल डिपार्टमेंट 1841 – 1921
6. फायनान्शियल डिपार्टमेंट 1862 – 1912
7. एज्युकेशन डिपार्टमेंट 1861 – 1865

व्हॉल्यूम लिस्ट – यात निरनिराळ या विभागाच्या सर्व कम्पायलेशन व व्हॉल्यूम च्या यादया आहेत. अनुक्रमांकानुसार या कम्पायलेशनना नंबर असून त्या समोर विषय नमूद केलेला असतो. त्यामुळे हवा असलेला अभिलेख शोधण्यासाठी सर्व कम्पायलेशनचे त्या - त्या वर्षाचे विषय पहावे लागतात. यानंतर विषयाच्या वर्णानुक्रमानुसार त्याचे व्हॉल्यूम तयार करण्यात आले. ही संदर्भसाधने वर्षानुसार आहेत. विषय वर्णानुक्रमे असून त्या त्या विषयाच्या समोर व्हॉल्यूम नंबर नमूद केलेला असतो.

इंडायसिस – पुराभिलेख संचालनालयात काही विभागाची इंडायसिस आहेत. त्यामध्ये विषय वर्णानुक्रमे दर्शविले आहेत. या संदर्भ साधनांमध्ये कन्सल्टेशन क्रमांक नमुद केलेले आहेत. परंतु त्यामध्ये कम्पायलेशन क्रमांक किंवा व्हॉल्यूम क्रमांक नमूद केलेले नाहीत. त्यामुळे संशोधकाना हवा असलेला अभिलेख पाहण्यासाठी त्या - त्या वर्षाच्या मिनिट बुक्स व व्हॉल्यूम लिस्ट यांचा आधार घ्यावा लागतो.

उपलब्ध असलेल्या इंडायसिसचा तपशील खालीलप्रमाणे :–

अ.क्र. विषय वर्ष
1. एक्स्लेस्टिकल डिपार्टमेंट 1847 – 1874
2. फायनान्शियल डिपार्टमेंट 1821 – 1863
3. जनरल डिपार्टमेंट 1821 – 1860
4. ज्युडिशियल डिपार्टमेंट 1821 – 1860
5. कमर्शियल डिपार्टमेंट 1822 – 1823
6. इंडो–युरोपियन टेलिग्राफ डिपार्टमेंट 1864 – 1872
7. मरीन डिपार्टमेंट 1821 – 1875
8. मिलीटरी डिपार्टमेंट 1821 – 1860
9. पोलीटीकल डिपार्टमेंट 1821 – 1860
10. रेव्हेन्यू डिपार्टमेंट 1821 – 1863
11. सिक्रेट डिपार्टमेंट 1821 – 1861

अल्फाबेटीकल कँटलाँग आँफ द कंटेन्टस् आँफ द बाँम्बे सेक्रेटरीएट रेकाँर्डस (1630 ते 1780) - ब्रिटीश सरकारने नियुक्त केलेल्या सिलेक्ट कमिटीने शिफारस केल्यानुसार जी. डब्ल्यु. फाँरेस्ट यांनी स्वत: तपासून ही यादी प्रसिध्द केली आहे.
प्रेस लिस्ट – प्रेस लिस्ट हा मुंबई पुरालेखागारातील ऐतिहासिकदॄष्टया सर्वात जुना अभिलेख आहे. 1891 मध्ये तत्कालीन राज्य सचिवांच्या सुचनेनुसार या याद्या तयार करण्यात आल्या. इ.स.1646 ते इ.स.1760 पर्यंतच्या मुंबई पुराभिलेख संचालनालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांचे सुचिकरण केलेले असून ते खाली दर्शविलेल्या चार प्रकाशनांमध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहे:–

(1) इ.स. 1646 ते 1700
(2) इ.स. 1701 ते 1719
(3) इ.स. 1720 ते 1740
(4) इ.स. 1741 ते 1760

तत्कालीन भारत सरकारच्या आदेशानुसार प्रेस याद्या तयार करणे बंद करण्यात आले व वर्णनात्मक माहिती पुस्तिका तयार करण्याचे त्याच वेळेस ठरविण्यात आले.

फाईल इंडायसेस – 1920 पासून सिक्रेट डिपार्टमेंटने फाईल इंडायसेस तयार करण्यास सुरवात केली. 1952–53 चे सिक्रेट डिपार्टमेंटचे छापील इंडायसेस पुरालेखागारात उपलब्ध आहेत. साधारणपणे 1954 पासून त्रिवर्णी फाईल पध्दत सुरू झाली. आणि याची टंकलिखित यादी या सूची स्वरूपात आहेत.

वर्णनात्मक सूची – (1755–1820) सिक्रेट अँड पोलिटीकल डिपार्टमेन्टच्या अभिलेखाची सुरूवात इ.स. 1755 पासून होते. यामध्ये प्रत्येक कागदपत्रांचा थोडक्यात विषय नमूद केलेला आहे व शेवटी अनुक्रमणिका दिलेली आहे. त्याच्या आधारे या विभागाचा हवा असलेला अभिलेख सहजासहजी सापडतो.
पुरालेखागारातील नकाशांच्या संग्रहाची सूचीपत्रे तयार करण्यात आली आहेत.

अभिलेखांच्या टंकलिखित प्रती– पुरालेखागारात काही अभिलेखांच्या टंकलिखित प्रती ठेवण्यात आल्या आहेत.