English

पुराभिलेख संचालनालयाचा आकॄतीबंध

पुराभिलेख संचालनालय या नावाने ओळ खला जाणारा हा विभाग महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कॄतिक कार्य विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे. एलफिंस्टन महाविद्यालय इमारत, फोर्ट येथे या संचालनालयाचे मुख्य कार्यालय असून संचालक हे संचालनालयाचे प्रमुख आहेत. एक उपसंचालक, मुख्य कार्यालय मुंबई साठी दोन तर पुणे, कोल्हापूर, नागपूर व औरंगाबाद या विभागीय कार्यालयांसाठी कार्यालय प्रमुख म्हणून प्रत्येकी एक सहाय्यक संचालक व त्यांचे अधिपत्याखाली ‘क’ व ‘ड’ वर्गीय कर्मचारी अशी या संचालनालयाची संरचना आहे.

पुराभिलेख संचालनालयाची, ‘अ’ वर्गीय 2 पदे, ‘ब’ वर्गीय (राजपत्रित)6 पदे, ‘ब’ वर्गीय (अ राजपत्रित)11 पदे ‘क’ वर्गीय 96 पदे, व ‘ड’ वर्गीय 105 पदे अशी एकूण 220 मंजूर पदसंख्या आहे.